Thursday, 6 August 2015

Valachya Ropachi Bhaji ~ Tender plants of Val Beans Stirfry

Tender, young plants of val beans are available in only monsoon. We can grow also in a tray at home. This is simple stirfry goes well with rice bhakari.


Ingredients:
 • Tender, young plants of val beans, chopped- 1 cup
 • Onion, chopped-  1 cup
 • Garlic, bruised- 5 to 6 cloves
 • Mustard seeds -  ½ tsp
 • Cumin seeds- ½ tsp
 • Asafetida (Hing) - ¼ tsp
 • Turmeric powder- ½ tsp
 • Homemade mix masala - 2 tsp or (1 tsp Chili powder +1 tsp Goda masala)
 • Grated jaggery- ¼ tsp (optional)
 • Kokum/Aamsul- 1
 • Salt- to taste
 • Oil- 2 to 3 tbsp
 • Fresh coconut, scraped- 2 tbsp 

Method:
 • Remove the roots of vegetables and wash properly. 
 • Chop the vegetables. You will get about 1 cup vegetable. 
 • Heat oil in a pan. Add mustard seeds. When the splattering starts, add cumin seeds garlic and onion. 
 • When onion become pink, add turmeric powder, hing, masala and sauté for a while. 
 • Add chopped vegetable, salt and sprinkle some water. Mix well, cover and cook for 15 to 20 minutes or till cooked on low heat. Stir occasionally. 
 • Add jaggery kokum, coconut and mix well, cover and cook for a minute on low heat.
 • Garnish with some scrapped coconut. 
 • Serve hot with rice roti/bhakari or dal-rice.


Notes:
 • You can use green chilli instead of mix masala.
 • You can grow in your home garden using val beans and tray.

वालाच्या कोवळ्या रोपांची भाजी 

पहिल्या पावसानंतर दोन दिवसातच हि भाजी बाजारात दिसू लागते आणि त्यानंतर साधारण आठवडाभर मिळते. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला कोंब धरतात, लगेच १-२ दिवसात त्याची अशी छोटी रोपे तयार होतात. अशी हि कोवळी रोपे खुडून त्याची भाजी केली जाते. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हि भाजी खूप मस्त लागते. 

साहित्य:
 • वालाची कोवळी रोप कापून, चिरून - १ कप (एक जुडी)
 • कांदा, चिरून- १माध्यम किंवा १ कप 
 • लसूण पाकळ्या, ठेचून - ५ ते ७
 • मोहरी-  ½ टीस्पून 
 • जीरे- ½ टीस्पून 
 • हिंग- ¼ टीस्पून 
 • हळद- ½ टीस्पून 
 • घरचा मिक्स मसाला- २ टीस्पून किंवा (१ टीस्पून मिरची पूड +१ टीस्पून गोडा मसाला)
 • गुळ- ¼ टीस्पून (ऐच्छिक) 
 • कोकम/आमसूल- १
 • मीठ- चवीप्रमाणे 
 • तेल- २ ते ३ टेबलस्पून 
 • ओले खोबरे, खोवुन - २ टेबलस्पून (ऐच्छिक) 
कृती:
 • रोपांची मुळे आणि वालांना चिकटलेली साले काढून टाका. भाजी स्वच्छ धुवून घ्या, माती असते.
 • भाजी चिरून घ्या.
 • पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की जीरे, कांदा, लसुण टाकून परतावे.   
 • कांदा गुलाबीसर झाला की त्यात हळद, हिंग, मसाला (मिरचीपूड टाकत असाल तर ती) टाकून जरासं परतून घ्यावं. 
 • आता त्यात चिरलेली भाजी व मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावं. वरून थोडसं पाणी शिंपडून झाकण ठेवावं १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवावं. झाकणावर पाणी ठेवलं तरी चालेल, करपायची भीती नाही. शिजताना भाजी मध्ये मध्ये हलवावी. 
 • भाजी व्यवस्थित शिजली की त्यात गुळ, कोकम आणि खोबरं घालावं. मस्त परतून मिक्स करावी.  
 • गरमागरम भाकरी सोबत किंवा डाळ-भातासोबत वाढावी. 
नोट्स: 
 • मसाला ऐवजी हि भाजी हिरवी मिरची फोडणीत चालून पण करतात. 
 • भाजी थोडी कडवट असते म्हणून थोडासा गुळ किंवा साखर लागते. 
 • मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, भाजी शिजल्यावर आळते. 
 • तुम्ही हि भाजी घरी सुद्धा उगवू शकता. ट्रे मध्ये वाल पेरून हे शक्य आहे. 

2 comments:

Sachin Patwardhan said...

हे वाल म्हणजे नेमके कुठले आहेत? फोटोवरून हे चवळीच्या वर्गातील कडधान्य वाटते. रत्नागिरी पट्ट्यात त्याला वाली म्हणतात. कृपया अधिक माहिती द्यावी. आपल्या ब्लॉगवर खास मराठी कोकणी पदार्थाची माहिती दिल्याबद्दल आपले आभार व विशेष कौतुक. ह्या सर्व पदार्थांचे डॉक्युमेंटेशन महत्वाचे आहे आणि तुम्ही ते करत आहात.

Purva Sawant said...

धन्यवाद! हे कडवे वाल आहेत. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला कोंब धरतात, लगेच १-२ दिवसात त्याची अशी छोटी रोपे तयार होतात. अशी हि कोवळी रोपे खुडून त्याची भाजी केली जाते.

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!