"Aamboli" is fluffy, spongy soft Maharashtrian style dosa. This is not crispy like dosa. This is a traditional malwani/kokani dish, and these can also be had with almost everything like chicken-mutton curry, veggie curry, chutney like ghavan.
Aamboli flour:
Store this flour in airtight container. Keep in dry place. Use this for 2-3 months.
Ingredients:
Method:
Notes:
आंबोळी
Aamboli flour:
- Thick rice (which is used for bhakari)- 1kg
- Split black gram(urad dal)- 250 gm
- Fenugreek seeds (methi dana)- 1 tsp
Store this flour in airtight container. Keep in dry place. Use this for 2-3 months.
Ingredients:
- Aamboli flour- 1 cup
- Salt- to taste
- Water- approximately 1+ ¼ cup (required some more or less, batter should be thick than dosa batter, because it become loose or thin after fermentation.)
- Oil- as required
Method:
- Combine aamboli flour in a container.
- Add water gradually in a flour. Mix and remove all lumps if any.
- Keep for fermentation in a warm place and let the mixture overnight.
- Next day while preparing, add salt in the batter and stir.
- Heat cast iron griddle or non-stick griddle. Sprinkle and spread little oil. (you can use half onion for spreading oil.)
- Making method is apart from dosa. Pour the batter circular, side of pan to middle of pan.
- Pour little oil at all sides of dosa.
- Cover and cook for 2-3 minutes or till all sides start leaving edges, turn (flip) it and let it cook for another 1 minute. When bottom side turn to golden brown, take it out from the griddle.
- Serve hot with mutton curry or chicken curry also. For vegetarians, it serves with black peas curry or black gram curry.
- It goes well also with green coconut chutney or boiled potato yellow subji.
Notes:
- You can make batter by other way: Wash all ingredients and soak it for at least 6 hrs.
- Grind it with water and make thick batter like idali batter consistency, let it ferment overnight. Rest of recipe is same as above. But this is not authentic method.
- Store leftover amboli batter in refrigerator with air-tight container for 3-4 days.
- Many people think that "Ghavane", "Dhirade" and "Aamaboli" are same , but it's not true. Refer these recipe also.
आंबोळी
आंबोळ्या ह्या कोकण स्पेशल पाककृती पैकी एक म्हणाव्या लागतील. काही लोक धिरडे, घावण आणि आंबोळी एकच समजतात. पण तस नाही आहे. निदान आमच्या कोकणात तरी धिरडे, घावण आणि आंबोळी हे तीन वेगळे पदार्थ आहेत. घावणे फक्त तांदुळाच्या पिठापासून व पीठ न आंबवता केले जातात तर धिरडे बनवताना पिठात ताक, मिरची वै. घातली जाते आणि आंबोळ्या कश्या करायच्या ते पहा.
खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळेच ते डोश्यापेक्षा वेगळे लागतात. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते.
आंबोळीचे पीठ :
भाकरीचे जाडे तांदूळ- १ किलो
उडीद डाळ- २५० ग्रॅम
मेथी दाणे- १ टीस्पून
वरील सर्व साहित्य निवडून एकत्र करून गिरणीतून जाडसर/रवाळ/खसखशीत दळून आणावे.
साहित्य:
आंबोळीचे पीठ- १ कप
मीठ- चवीनुसार
पाणी- अंदाजे १+ १/४ कप (थोडस कमी-जास्त, डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे हव.)
कृती:
पिठात पाणी मिसळून सरसरीत भिजवावं व सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.
हे मिश्रण एका डब्यात भरून उबदार जागी रात्रभर ठेऊन द्यावे.
करतेवेळी मीठ घालून छान ढवळून घ्यावे.
नॉन-स्टीक तवा किंव्हा बीडाची "कावील" गरम करावी.
चमच्याने किंव्हा कांदा अर्धा कापून, त्याने तव्याला तेल लावावं. ऑईल स्प्रेचा सुद्धा वापर करता येईल. (माझी आई नारळाच्या शेंबीने कावीलला तेल लावायची.)
तवा चांगला गरम झाला कि वाटीने किंव्हा पळीने तव्याच्या कडे पासून मध्यापर्यंत हे मिश्रण गोलाकार ओतावे. (सविस्तर कृतीसाठी "घावण" ची कृती वाचावी.)
झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. कडा सुटताच उलटे करावे व १-२ मिनिटे शिजू द्यावे.
आंबोळी तयार……… मटण रस्सा /कोंबडी रस्सा किंव्हा काळे वाटाणे आमटी / चणे आमटी सोबत खा. नारळाच्या चटणीसोबत पण मस्त लागते.
No comments:
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!