Amba Dal (Kairichi Dal) is a Maharashtrian recipe which is mainly made for Chaitra Gauri Pujan. Amba dal and Panhe is offered to godess Parvati (Gauri).
Ingredients:
कृती:
Ingredients:
- Raw mango (Kairi), grated- ¼ cup or some more (depends upon sourness of raw mango)
- Chana dal- ½ cup
- Green chillies- 2 to 3
- Ginger- ½ inch
- Fresh coconut, scrapped- ¼ cup
- Sugar- a pinch
- Salt- to taste
- Oil- 2 tsp
- Mustard seeds- ½ tsp
- Asafoetida (Hing)- ½ tsp
- Turmeric powder- ½ tsp
- Byadagi red chilli- 1 to 2
- Fresh coriander, finely chopped- 2 tbsp
Method:
- Soak chana dal for minimum 4 hours.
- Drain all the water. Grind dal coarsely with green chilies and ginger. Do not use water to grind.
- Peel raw mango and grate it.
- Combine ground dal, grated raw mango, scrapped coconut, sugar and salt.
- Heat oil in the small (tadka) pan and add mustard seeds. Once mustard seeds crackle, add red chili, asafoetida and turmeric powder. Saute for few seconds and immediately add on dal mixture. Mix well.
- Garnish with chopped coriander. Amba dal is ready to serve.
आंबेडाळ ~ कैरीची डाळ
साहित्य: - कैरी, किसून- १/४ कप (कमी आंबट असेल तर जास्त घ्यावी.)
- चणा/ हरबरा डाळ- १/२ कप
- हिरव्या मिरच्या- २ ते ३ (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात)
- आल्याचा तुकडा- १/२ इंच
- खोवलेले ओले खोबरे- १/४ कप
- साखर- चिमुटभर
- मीठ- चवीप्रमाणे
- कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
- तेल- २ टीस्पून
- मोहरी- १/२ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- लाल ब्याडगी मिरची- १
- कढीपत्ता- ३ ते ४ पाने (ऐच्छिक)
कृती:
- चणा डाळ सध्या पाण्यात कमीतकमी ४ तास भिजत घालावी.
- कैरीची साल काढुन खिसुन घ्यावी.
- हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढुन त्याचे पण तुकडे करावेत.
- भिजवलेल्या डाळीतील सर्व पाणी काढून टाकावे व मिक्सरवर आले व मिरचीसोबत भरडसर वाटून घ्यावी. (कैरी खिसली नसेल तर मिक्सरमधे डाळीसोबत वाटली तरी चालते.)
- ओले खोबरे, मीठ व साखर घालुन सगळे एकत्र नीट मिसळुन घ्यावे.
- कढल्यात किंवा छोट्या पॅनमध्ये तेल तापवून मोहरी, लाल मिरची तोडून घालावी. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे.
- वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
No comments:
Post a Comment
Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!