Wednesday 1 July 2015

Tea Spice Powder ( Chai Masala)

Chai masala powder gives a nice taste and aroma to the tea. It has lots of health benefits too due to presence of useful spices. This is useful to relief in fever and cure sore throat. This is very easy to make as all the ingredients are mostly available in our kitchen. This masala can be added in the milk.




Ingredients:
  • Cinnamon (dalchini), cut into small pieces- ¼ cup
  • Cloves (laung)- 2 tbsp
  • Black peppercorns (kalimirch)- ¼ cup
  • Green cardamom (elaichi)- ¼ cup
  • Nutmeg (jaiphal), grated- 1
  • Dried ginger powder (soonth)- ¼ cup
  • Dry basil leaves (tulsi)- 10 (optional)

Method:
  • Dry roast the cinnamon, cloves, black pepper, and cardamom for 5 minutes on low heat. Cool completely.
  • Add the nutmeg and ginger powder basil leaves and grind to make a fine powder.
  • Cool completely and store in an air-tight container.
  • Use as required. Use approx ¼ tsp for each tea cup.

चहाचा मसाला.........चहा मसाल्याने चहाला छान चव आणि वास येतो. शिवाय औषधी सुद्धा आहे.  पावसाळ्यात किंवा थंडीत नेहमीचा चहा पिण्याऐवजी आल्याचा चहा प्यावासा वाटतो. घरात आलं नसेल तर मसाला टाकून ती तलफ भागवता येते. हा चहा खवखवणाऱ्या घशाला आणि मरगळलेल्या मनाला आराम देतो. 

साहित्य:
  • सुंठ- १/४ कप 
  • लवंग- २ टेबलस्पून  
  • काळी मिरी- १/४ कप 
  • दालचिनी, छोटे तुकडे करून किंवा कुटून- १/४ कप 
  • वेलची- १/४ कप 
  • जायफळ, किसुन - १ अख्ख 
  • सुकलेली तुळशीची पाने- १० (ऐच्छिक)  

कृती:

  • जायफळ आणि सुंठी शिवाय बाकी सगळे मसाले थोडे थोडे भाजून, थंड होऊ द्यावे. 
  • तुळशी पाने, सुंठ आणि जायफळ पूड त्यात घालून मिक्सर मधून काढावे. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात हा मसाला  ठेवावा. अगदी वर्षभर छान टिकतो. 
  • चहाच्या एका कपाला साधारण १/४ टीस्पून एवढा घालावा.  दुधात टाकून पण छान  लागतो. (चहात किंवा दुधात टाकून उकळावा.)    

टीपा:
  • वर दिलेल्या मसाल्याच्या पदार्थांच्या तयार मिळत असलेल्या पावडर एकत्रित करून सुद्धा झटपट मसाला करता येईल. 
  • सुंठीचे प्रमाण तिखटपणा किती हवाय, यावर अवलंबून आहे. प्रमाण वाढवले तरी चालेल.  
  • औषधी गुणधर्म वाढवायचे असतील तर २ टेबलस्पून पिंपरामुळ पूड घालावी.  
  • कॉफी ग्राईंडर असेल तर उत्तम. त्यात छान दळला जातो हा मसाला. 

No comments:

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!