Wednesday, 8 July 2015

Wild Vegetable Fodashi or Kulu or Kavalla

Fodashi or Kulu or Kavalla is a wild vegetable and available in the only monsoon. Maybe it is known by other names in India. I have given some recipes here for this vegetable. 
But remember, buy wild vegetables only from a regular or trustful person. Wrong wild vegetables might be poisonous. 

Introduction:
This vegetable looks like a spring onion. This is the type of grass actually.



  # Method 1 (Non-Vegetarian: with sukat/suka jawala)



Ingredients:
  • Fodashi- 1 bunch 
  • Sukat/Suka jawala- ½ cup
  • Onion, chopped-  1 cup
  • Garlic, bruised- 6 to 8 cloves
  • Asafetida (Hing) - ¼ tsp
  • Turmeric powder- ½ tsp
  • Homemade masala  or Malwani masala- 2 tsp 
  • Kokum/Aamsul- 3
  • Salt- to taste
  • Oil- 3 tbsp
Method:
  • This small grass bunch has one stiff stick inside. Remove this stick and remove flowers if any.
  • Wash carefully in large amount of water. There could be mud in the folds of leaves. 
  • Chop the vegetable. You will get about 2 cups vegetable from one bunch. 
  • Soake sukat/suka jawala in water for 15 minutes. After that squeeze these jawala.
  • Heat oil in a pan. Add garlic and onion. When onion become pink, add turmeric powder, hing, masala and sauté for a while. 
  • Add squeezed jawala and saute for a while.
  • Add chopped vegetable, salt and little water.  Mix well, cover and cook for 15-20 minutes on low heat. 
  • Stir occasionally. Sprinkle some water in between if needed. 
  • Add kokum and cook for a minute on low heat.
  • Serve hot with bhakari or dal-rice.
...................................................................................................
# Method 2 (Vegetarian: with chana dal)

Ingredients:
  • Fodashi- 1 bunch 
  • Chana dal (Split bengal gram)- 2 tbsp
  • Onion, chopped-  1 cup
  • Garlic, bruised- 6 cloves
  • Mustard seeds -  1 tsp
  • Asafetida (Hing) - ¼ tsp
  • Turmeric powder- ½ tsp
  • Homemade masala - 2 tsp or (1 tsp Chili powder +1 tsp Garam masala)
  • Salt- to taste
  • Oil- 3 tbsp
  • Fresh coconut, scraped- 2 tbsp (optional)

Method:
  • Soak chana dal in water for min 2 hours.
  • This small grass bunch has one stiff stick inside. Remove this stick and remove flowers if any.
  • Wash carefully in large amount of water.
  • Chop the vegetable. You will get about 2 cups vegetable from one bunch. 
  • Heat oil in a pan. Add mustard seeds. When the splattering starts, add garlic and onion. 
  • When onion become pink, add turmeric powder, hing, masala and sauté for a while. 
  • Add chana dal, little water and salt to taste. Mix well, cover and cook for 5 minutes on low heat.
  • Add chopped vegetable, salt and little water.  Mix well, cover and cook for 15-20 minutes on low heat. 
  • Stir occasionally. Sprinkle some water in between if needed. 
  • Garnish with some scrapped coconut. 
  • Serve hot with chapati, bhakari or dal-rice.
...................................................................................................
# Method 3 (Vegetarian)
Bhajee/Pakode:
Chop the vegetable. Add carom seeds (ajwain), cumin powder, coriander powder, red chili powder, gram flour (besan) and salt. Add water as required. You can add some chopped onion also. Make bhaji/pakoda as usual.

You can make vadi as like Kothimbir vadi.


Tips:
  • This vegetable looks like spring onion but this takes more time to cook than spring onion. 
  • You can make dried shrimp/suka jawala with spring onion like above method.
  • This vegetable has lightly bitter taste but not as much methi/fenugreek. 


फोडशी/कुलुची भाजी


फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते. 
ओळखीच्या भाजीवाली कडूनच किंवा जाणकार व्यक्तीकडूनच रानभाज्या विकत घ्याव्यात, चुकीच्या भाज्या विषारी असू शकतात. 

# पध्दत १ (सुकट घालून)
साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
सुकट /सुका जवळा- १/२ कप
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६ ते ८
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
कोकम/आमसूल- ३
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून

कृती:
  • सुकट  निवडून पाण्यात किमान १५ मिनिटे भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून घट्ट पिळुन घ्या.  
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात काळजीपुर्वक स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ आणि पानांच्या चुणेत माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजवून पिळुन घेतलेली सुकट टाका व जराशी परतून घ्या. 
  •  नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • गरमागरम भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
.................................................................................................... ………

# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
चणा डाळ - २ टेबलस्पून
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेला लसूण पाकळ्या - ६
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम  मसाला- १ टीस्पून)
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून
खवलेले ओलं खोबरं- २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती:
  • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा. 
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. 
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • वरून ओलं खोबरं पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

टिपा:
  • या  भाजीची भजी पण करता येते. भाजी बारीक चिरून घ्यावी. त्यात थोडा चिरलेला कांदा, ओवा, धने-जिरे पूड, मिरची पूड, मीठ घालून कालवावी आणि जरुरीप्रमाणे बेसन घालावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे. चिमूटभर खायचा सोडा घातला तर भज्या हलक्या होतात. आणि नेहमीप्रमाणे खरपूस टाळून घ्याव्यात.  
  • हि भाजी पातीच्या कांद्याप्रमाणे दिसते. पतीचा कांदा फार लवकर शिजतो पण ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो.
  • तुम्ही वरील पद्धतीने सुकट घालुन पातीच्या कांद्याची भाजी करू शकता.
  • हि भाजी किंचित कडू असते पण अगदी मेथी इतकी कडू नसते.
  • या भाजीच्या पानांची भजी पण करता येते. पालक किंवा मेथीची गोळा भजी करतो तशी.  

5 comments:

roma said...

Hi,
Nice recipe!
Thanks a lot. I always used to wonder on seeing this vegetable in the market.
There is another wild vegetable available during monsoon. They call it Shevale. Can you give a recipe for that too?

Purva Sawant said...

Thanks Roma for ur compliment. Yes, I know @ Shevale. I am planning to post this recipe also.

SayaleeM said...

Please शेवळ भाजी चि कृती द्यावी अगदी निवडावी कशी हे पण picture सकट द्यावे pl pl

Purva Sawant said...

Sure...

Unknown said...

Fodashi is a different veggie.. Red stem n maple shape green leaf. Fodashi is also ran bhaji with nice aroma.
The given is kulee or kavali bhaji

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!