Monday, 28 October 2013

Besan Ladoo

On the occasion of Diwali, ladoo has very importance. We make many kinds of ladoo but the most liked is the ‘ Besan Ladoo’. They are melting in the mouth.

Ingredients:
 • Spilt bengal gram (chana dal)- 500 gm (or ready made sp. gram flour which is used for ladoo, available in the market) 
 • Powered sugar- 350 gm to 375 gm 
 • Clarified butter (Desi ghee)- 250 ml 
 • Charoli (chironji) - 1 tsp
 • Dry Fruits ( Pista /Almonds /Raisins,) – as needed (approx. half cup) 
 • Cardamom Powder – 2 tsp 
Method:
Dry roast chana dal just for only 1-2 minutes on low to med heat and grind from flour mill.

Mix gram flour and ghee over a low to medium heat in a heavy bottom or non-stick kadhai and constantly keep stirring to avoid lumps. If you stop stirring, besan will stick to the bottom.

First, this mixture will become thick like crumble.
But after 15 to 20 minutes, the consistency will be thin. Give your attention in only this task (roasting), otherwise may be it will burn at bottom.


Colour changes slowly. Roast till colour turns to light brown (like almond shell/ badami). I think (as per my mom's instructions and according to taste), yellow coloured ladoo is raw and sticks in mouth. So roast properly. Do not make the flame too high as it will only change the colour and will remain raw.

When it releases an appetizing smell and turns to light brown (like almond shell/ badami, see the pic.), remove it from the heat and allow cooling. (Plz note this....Allow the mixture completely cool.)
Sieve powder sugar. Make sure that no any lump in it.
Add powdered sugar and nuts to the roasted gram flour and mix thoroughly.
Add sugar little by little, not at a once. Check the sweetness, then add more.
Mix well by kneading.
Roll med size balls of the mixture. Ladoos are ready to be served. Always roll again before serving. (They are soft due to pure ghee.)


Tips:

 • It contains lots of desi ghee (sajuk tup), due to this they do not maintain their round shape. They melt again and stick each other. So when you will going to serve, roll again. (Avoid this, you may add 100 gm of vanaspati ghee and 150 ml of desi ghee. But pure ghee's ladoo is always most tasty, melts in a mouth. 
 • Never heat this mixture again after adding sugar otherwise forms sugar lumps in it. 

I think besan ladoo's taste is totally depends upon your patience and efforts. Best luck.बेसन लाडू 

साहित्य:

 • चणाडाळ - ५०० ग्रॅम
 • साजूक तूप- २५० मिली 
 • पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
 • वेलचीपूड- २ टीस्पून 
 • चारोळी व सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)

कृती:

 • डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.) 
 • गिरणीतून दळून आणावी. 
 • बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील. 
 • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.) 
 • बेसन पूर्ण गार होवू द्यावे. 
 • पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी. 
 • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी. 
 • नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
 • साजूक वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात, ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.

सुचना:

 • जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ होतात.
 • बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल. 
 • पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
 • किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
 • कधीही भाजलेले बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या तयार होऊन लाडू बिघडतात. 
 • घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.
 • काहीजण बेसन लाडूसाठी पीठ रवाळ दळून आणतात, मला तसे नाही आवडतं.    

शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे.

2 comments:

Unknown said...

Lovely recipe.
Thanks for sharing.

Unknown said...

My all time favourite.Your recipe is very goodp

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!