Friday 28 March 2014

Jayfal Murabba (Nutmeg Fruit Murabba/Jam)

Did you hear about this before? In our "Konkan", we are made pickle from nutmeg fruits traditionally because the fruits are sour. So my MLA thought, why not murabba? and she made this murabba/jam. This is absolutely delicious.





Introduction: 

Nutmeg/Jayfal Tree and Fruit -

You can see here, Nutmeg fruits (whitish coloured), Jaypatri or Mace (Red coloured) and Jayfal or Nutmeg. This fruits arrive in monsoon. 

These are nutmeg seeds. Actual nutmeg is inside the seeds. 




Ingredients:

  • Nutmeg fruits- 6 
  • Sugar- approx 500 gm (Use sugar as equal to nutmeg fruit hash.) 
  • Cloves- 4 to 5 
Method:
  • Clean, cut and remove the inner seed. 
  • Grate outer fleshy/whitish part of nutmeg. 
  • Combine this nutmeg grate/hash, sugar and cloves in the heavy bottom vessel. 
  • Cook this mixture for approx. half an hour on low-med heat. Sugar syrup will become thick. Stir it continuously without burning. 
  • Allow it to cool completely. Store in clean and dry glass container. You may refrigerate it. 
  • Serve with chapati or bread. 

जायफळाचा मुरंबा 
आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला खूप आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. एकदा माझ्या सासूबाईंनी विचार केला की मुरंबा पण बनवून पाहावा. लगोलग कृती करण्यात आली आणि सादर करत आहे हि जायफळे वापरून बनवलेला मुरंबा......आंबट-गोड चवीचा मुरंबा मस्त लागतो आणि जायफळाचा वासही येतो. या मुरंब्याला सुंदर लालसर रंग येतो.
जायफळाची फळे मधोमध  कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात.

साहित्य:
  • जायफळाची फळे  - ६
  • साखर- अंदाजे ५०० ग्रॅम (जेवढा कीस, तेवढीच साखर घ्यावी)  
  • लवंगा- ५
कृती:
  • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाचा भाग किसून घ्यावा.
  • एका जाड बुडाच्या किंव्हा नॉन-स्टिक भांड्यात जायफळाचा कीस, साखर आणि लवंगा एकत्र करून मध्यम आचेवर शिजवावे.
  • सतत ढवळावे अन्यथा करपण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने साखर वितळू लागेल. साधारण अर्ध्या तासाने पाक घट्ट होऊ लागेल.
  • गॅस बंद करून मुरंबा थंड होऊ द्यावा. काचेच्या कोरड्या व स्वच्छ बरणीत मुरंबा भरावा.
  • चपाती किंव्हा ब्रेड बरोबर छान लागतो.

No comments:

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!