Friday 11 July 2014

Dried Prawns, Jackfruit seeds, Brinjal & Potato Thick Curry

My favorite  Kokani dried pranwns curry........ it's really delicious. 



Ingredients:

Method:
  • Torn dried prawns into small pieces. Wash properly & soak in regular temperature of water for 15 minutes & then squeeze them.
  • Peel potatoes and cut into 1 inch pieces. Cut brinjal into 1.5 inch pieces approx. Cut into half or bruise and peel  jackfruit seeds. Chop onion finely.
  • Heat 3 tbsp of oil in a small pressure pan. Add onion & sauté till it turn dark brown (not burnt). 
  • Add hing, turmeric powder & sauté for few seconds. 
  • Add masala powder, ginger-galic paste and coconut paste. Sauté till oil come out from masala. 
  • Add Soaked & squeezed dried prawns. Sauté for 1-2 minutes in masala. Add jackfruit seeds, brinjal, potato, salt & kokam. 
  • Add some water to adjust consistency as per personal choice. But remember it’s thick curry. Mix well and pressure cook till 3-4 whistles are given out.
  • Garnish with coriander. Serve hot with chapati or bhakari.

सोडे घालून वांग, बटाटा आणि फणसाच्या बियांची भाजी


साहित्य:
  • सोडे किंव्हा सुकट/सुका जवळा - १/२ कप
  • कांदा, बारीक चिरून - १ मध्यम
  • वांगे, तुकडे करून - १ मध्यम
  • बटाटा, तुकडे करून- १ मध्यम
  • फणसाच्या बिया-  १० ते १२ (उपलब्ध असतील तर)
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून
  • आले-लसूण वाटण- २ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • घरगुती मिक्स मसाला किंव्हा मालवणी मसाला किंवा आगरी-कोळी मसाला  - ३ ते ४ टीस्पून
  • कोकम- ३ ते ४
  • तेल- ३ टेबलस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • कोथिंबीर, बारीक चिरून  - २ टेबलस्पून

कृती:
  • सोड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. पाण्यात किमान १५ मिनिटे भिजू द्या. नंतर घट्ट पिळून घ्या.
  • फणसाच्या बिया ठेचा किंव्हा मध्ये २ भागात कापून घ्या आणि सोलून घ्या.
  • छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करा.  त्यात कांदा लालसर परतून घ्या.
  • त्यात हळद, हिंग, मसाला, आले-लसुन वाटण, भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  • त्यात सोडे टाकून जरासे परता.
  • त्यात सर्व भाज्या, कोकम व मीठ घाला. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घाला. जास्त पाणी घालू नका कारण याचा अंगासरशीच (घट्ट) रस्साच  चांगला लागतो.
  • कुकरला २-३ शिट्ट्या घ्या.  वाढताना कोथिम्बिर टाका.
  • भाकरी किंव्हा चपाती बरोबर मस्त लागतं.

टीप:

  • सोड्या ऐवजी सुकट/सुका जवळा घालून सुद्धा हि भाजी खूप मस्त लागते. करायची अगदी हीच पद्धत आहे. पण सुकट घालत असाल तर रस्सा न ठेवता सुकीच करावी, खोबऱ्याचे वाटण घालू नये.
  • (भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- सुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत गडद तपकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे. हे वाटण फ्रिझरला ठेवले तर २-३ महिने व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही खमंग भाजलेले खोबरे वाटले जाते, पटकन भरड वाटणे अन्यथा तेल सुटते. जास्त दिवस टिकते. फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.)

No comments:

Post a Comment

Your feedback is valuable. Keep supporting and loving for ever .....!