Wednesday, 26 October 2016

Sukya Khobaryachi Karanji ~ Maharashtrian Style Gujia

Karanji is made specially for Diwali in Maharashtra. This is a popular Indian dessert prepared all over India. Karanji is also known as Gujia or Pirikiya in north India. So you can find many versions of Karanji or Gujia. Layer karanji looks beautiful and fully white but time-consuming. This is plain karanji which is very easy and quick to make. So I prefer to do this this Diwali.
Here is our recipe........



Ingredients:
Refined sunflower oil or Vanspati ghee for frying- as required

For the filling: 
  • Dry coconut, finely grated- ½ cup (You can use desiccated coconut)
  • Fine semolina/ Barik rava/ Mahin suji-  ½ cup
  • Powdered sugar- approx ¾ cup
  • Poppy seeds (Khaskhas)- 1 tbsp (optional)
  • Charoli (chironji)- 1 tbsp
  • Cardamom powder- 1 tsp
  • Nutmeg powder- ½ tsp
  • Pure ghee- 1 tsp
For the cover:
  • All purpose flour / Maida- 1cup
  • Fine semolina/ Barik rava/ Mahin suji-  ½ cup
  • Salt- a pinch
  • Hot Refined sunflower oil or Vanspati ghee (mohan)- 5 tbsp
  • Milk + water or only milk- approx ½ cup

Method:
For filling:
  • Roast coconut lightly until light brown and crispy.
  • Roast poppy seeds until golden brown.
  • Roast  chironji lightly.
  • Heat 1tsp ghee and roast semolina in this ghee until it emits nice aroma and turns light brown.
  • Crush or churn coconut with hands.
  • Combine coconut, poppy seeds, semolina, chironji, cardamom powder, nutmeg powder and powdered sugar.
For the cover:
  • Sieve maida, combine all dry ingredients and add hot oil/ghee (mohan), mix with a spoon.
  • Add milk+water little by little by using spoon. Knead and make a tight dough.
  • Cover and set the dough aside for two hours.
  • Knead this dough again. If it is going very hard to knead, cut into small pieces of dough and knead in food-processor.
  • Now the consistency of the dough should be such that you should be able to roll it. 


Assembly:
  • Divide dough into small portions and shape into balls. 
  • Roll out each ball into a circle, put a small portion of the filling.  
  • Then cover it with the other half bringing the edges over each other. Seal the edges with milk properly so that the mixture doesn't come out. Make sure there is no air inside the sealing.
  • With karanji cutter, cut off the excessive part of the edges. Be careful while doing so as if you cut very close the filling the karanji would open up. Cover karanjis with a damp cloth.
  • Heat sufficient oil/ghee in a kadai on high heat and deep fry the karanjis on medium to low heat in till they are crisp and a pleasant golden colour. 
  • Drain on absorbent paper and allow to cool completely.
  • Allow to cool. Store in air tight container.


सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

साहित्य:
रिफाइंड सुर्यफुल तेल किंवा वनस्पती तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार 
पारी-
  • मैदा- १ कप (२ वाट्या)
  • बारीक रवा- १/२  कप (१ वाटी) 
  • मीठ- चिमुटभर 
  • गरम रिफाइंड सुर्यफुल तेल किंवा वनस्पती तूप (मोहन)- ५ टेबलस्पून 
  • दुध किंवा दूध+पाणी- अंदाजे १/२  कप  

सारण/चुरण-
  • बारीक रवा- १/२ कप (१ वाटी)
  • सुके खोबरे, बारीक खिसुन- १/२ कप (पाऊण वाटी ते १ वाटी)
  • पिठीसाखर- अंदाजे ३/४ कप (१ वाटी) ~ आपल्या चवीप्रमाणे थोडे कमी-जास्त घ्यावे पण सारण जास्त गोडच हवे, कारण नंतर करंजी खाताना ते बरोबर लागते.
  • खसखस- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • चारोळी- १ टेबलस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून
  • साजूक तूप- १ टीस्पून


कृती :
  • प्रथम खोबरे चुरचुरीत भाजून घ्या व हाताने बारीक चुरा, खसखस भाजून त्याची भरड पुड करावी, नाही केली तरी चालेल. 
  • १ टीस्पून तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. 
  • नंतर दिलेले सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. 
  • रवा-मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे व मोहन घालावे. थोडं थंड झाल्यावर सर्व पीठ हाताने चोळून घ्यावे म्हणजे सर्व पीठाला मोहन लागते. 
  • दुधाने घट्ट पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे किंवा फूडप्रोसेसरला बारीक तुकडे करून फिरवावे. 
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावे. 
  • त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. 
  • सारण भरून घ्यावे व पुरीच्या कडेला बोटाने जरासं दूध लावून घडी करून दाबावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातण्याने कापून घ्यावे. अश्या प्रकारे करंज्या तयार करून घ्याव्यात.  तयार कारंज्यावर ओले (भिजवून घट्ट पिळलेले) फडके ठेवा म्हणजे त्या सुकत नाहीत. 
  • कढईत तेल/तूप चांगले तापवून घ्यावे. मात्र करंज्या मध्यम ते मंद आचेवरच तळाव्यात. तळताना करंजीवर तेल घालत घालत तळावे. 
  • तळलेल्या करंज्या टिशु पेपर किंव्हा कोऱ्या पेपरवर पसरून ठेवाव्यात.
  • करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भराव्यात. 

टीपा :
  • आम्ही सारण जरा जास्तच करून ठेवतो. कारण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा करंज्या कराव्या लागतात. सारण उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे, ६ महिने टिकते. पुन्हा करंज्या करायचा कंटाळा आला तर कणकेचे लाडू किंवा मेथीचे लाडू मध्ये वापरावे.   
  • साठ्याच्या करंज्या किंवा खाज्याचे कानवले करायला थोड्याश्या वेळखाऊ असतात  पण खूप सुंदर दिसतात तसेच त्याला खूप पदर सुटतात. त्या करंज्या मी पुढल्या वेळेस दाखवेन.