All non vegetarian lovers' delight, the Kokani mutton curry has the perfect blend of spices, onion-coconut paste. Enjoy this soupy spicy hot curry.........
Ingredients:
Mutton, washed and cubed- 1 kg
Turmeric powder- 1 tsp
Asafetida (Hing) - ½ tsp
Ginger- garlic paste- 4 tsp (use homemade paste, ready-made paste contains vinegar)
Onion,chopped- 1 large size (around ¾ cup)
Homemade Masala/ Malwani masala/ Sunday Masala- 5 to 8 tsp (as per your taste, I use 6 tsp)
Potato- 2 medium size (optional)
Bay leaf- 4 to 5
Cinnamon stick- 2 inch piece
Black pepper corns- 6
Oil- 6 tbsp
For coconut paste-
Oil- 2 tsp
Chopped onion- ¼ cup
Grated fresh coconut or dry coconut- ¾ cup to 1 cup
Poppy seeds (Khaskhas)- ½ tsp
Black pepper corns- 2
Mace (Javitri)- 1 small
Coriander seeds- ½ tsp
Cumin seeds- ½ tsp
Fennel seeds- ½ tsp
Star anise-1
Cloves- 3
Black cardamoms (Badi elayachi)- 1
Green chillies- 1 or 2
Fresh coriander leaves- a handful or ¼ cup
Heat oil in a pan, add all dry spices and chopped onion, saute for 2 minutes. Add grated coconut, saute until brown in color. Let this mixture cool, grind with chilli, coriander and some water into fine paste.
Method :
Marinate the mutton with ginger-garlic paste, turmeric powder, hing and salt for minimum 30 minutes.
Heat the oil in big pan or wok, add bay leafs, pepper corns, cinnamon and onion, saute till translucent.
Add the marinated mutton and saute on high flame for 5 minutes.
Cut potatoes into two half and add in mutton.
Add some water. Cover the wok with s.s. plate. Pour some water on a plate. Cook mutton for 15-20 minutes on medium heat. This yellow curry is also very testy.
You can have this yellow cury as "Mutton clear soup".........
Now add homemade masala or malwani masala and above mentioned coconut paste. Add some required water to adjust consistency of curry. Cover and cook on low to med heat for 45 to 60 minutes or till cooked. Stir occasionally.
Check the salt and consistency of curry. If necessary, add some hot water. Add the same water which we pour on plate. This is a thin curry. Boil curry for 3-4 minutes.
Serve hot with rice, chapati, bhakari, aamboli or vade.
You can cook this mutton in pressure cooker also. But it tastes better in slow cook method. You can prepare chicken curry (Kombadi rassa) with same ingredients and method. But remember that chicken need less time to cook.
कोकणी स्टाईल मटण रस्सा
साहित्य:
मटण - १ किलो
बटाटे- २ मध्यम आकाराचे
आल-लसुण पेस्ट - ४ टीस्पून
कांदा, चिरुन- १ मोठा
हळद- १ टीस्पून
हिंग- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - ५ ते ८ टीस्पून (आवडीनूसार कमी जास्त वापरा, मी ६ टीस्पून वापरला आहे )
तेल- ६ टे.स्पून
दालचिनी- २ इंचाचा तुकडा
काळी मिरी - ६
तमालपत्र- ६
मीठ - चवीनुसार
वाटण-
तेल- २ टीस्पून
खवलेल ओल खोबर - ३/४ कप ते १ कप
कांदा, चिरुन- १/४ कप
लवंगा- ३
जिरे- १/२ टीस्पून
मसाला वेलची- १
धणे- १/२ टीस्पून
बडीशेप- १/२ टीस्पून
खसखस- १/२ टीस्पून
काळी मिरी- २
बाद्यान - १
जायपत्री- १ छोटी
कोथिंबिर- १/४ कप किंव्हा मुठभर
हिरवी मिरची- १ किंव्हा २
तेलावर सर्व खडे मसाले आणि कांदा टाकून १ मिनिट परतवा. त्यात खोबर टाकून खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिरची, कोथिंबीर आणि थोड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
कृती:
मटण स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. मटणाला हळद, हिंग, आल-लसूण पेस्ट आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा तास मुरत ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करुन त्यात कांदा आणि वर दिलेले खडे गरम मसाले गुलाबी होइस तो पर्यंत परता.
आता मटन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता.
त्यात पाणी व एका बटाट्याचे दोन तुकडे या प्रमाणे तुकडे करून टाका. झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या.
मग मसाला आणि वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. ४५ ते ६० मिनिट मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
मधेमधे हलवत रहा. हा रस्सा पातळ असतो तेव्हा जरुरीनुसार गरम पाणी टाका. झाकानावरचे टाकले तरी चालेल. ४-५ मिनिटे अजुन शिजवा. चव घेऊन मिठाचे प्रमाण पहा.
हे मटन कुकरमध्ये पण शिजवता येईल. पण बाहेर केलेल्या मटणाची चव काही न्यारीच असते.
ह्या पद्धतीने कोंबडी पण शिजवता येईल. पण लक्ष्यात ठेवा, कोंबडी शिजायला कमी वेळ लागतो.